गणपति नमिती स्तविती सुरपति तुज भजती ॥
सकलारंभी स्मरती विघ्ने संहरती ॥
शुडामांडतमूर्ती अतर्क्य तव कीर्ती ॥
आरती कवनलागीं देई मज स्फूर्ती ॥०१॥
जय देव जय देवा सुंदरगजवदना ।
तव भजनासी प्रेमा देई सुखवदना ॥
जागृति स्वप्नी माझ्या हृदयीं त्वां राहावें ॥
दुरतर भवपाशाच्या बंधा तोडावें ॥
सिंदूरवदना सखया चरणा दावावें ।
अघोरदुर्गंतिलांगी सत्वर चुकवावें ॥०२॥
जय देव जय देवा सुंदरगजवदना ।
तव भजनासी प्रेमा देई सुखवदना ॥
न कळे अगाध महिमा श्रीवक्रतुंडा ।
अतर्क्य लीला तुझी शोभे गजशुंडा ॥
तुजविण न दिसे देवा शमविल यम पीडा ।
भक्तसंकटी येसीं धावत दुडदुडां ॥०३॥
नयनीं शिणले देवा तव भेटीकरितां ।
तापत्रय दीनाचें शमवी समर्थ ।
अना कल्पद्रुम तूची शिव सूता ।
विष्णूदासें चरणी ठेवियला माथा ॥०४॥
जय देव जय देवा सुंदरगजवदना ।
तव भजनासी प्रेमा देई सुखवदना ॥