Ganesh Shloka Sada Sarvada Lyrics “सदा सर्वदा योग तुझा घडावा”

सदा सर्वदा योग तुझा घडावा ।
तुझे कारणी देह माझा पडावा ॥
उपेक्षु नको गुणवंता अनंता ।
रघुनायका मागणे हेचि आतां ॥१॥

उपासनेला दृढ चालवावें ।
भूदेव संताशी सदा नमावें ॥
सत्कर्म योगे वय घालवावें ।
सर्वामुखी मंगल बोलवावें ॥२॥

कैलासराणा शिव चंद्रमौळी ।
फणिंद्र माथा मुकुटी झळाळी ॥
कारुण्य सिंधू भवदुःखहारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥३॥

उडाला उडाला कपि तो उडाला ।
समुद्र उलटोनी लंकेशी गेला ॥
लंकेशी जाऊनी चमत्कार केला ।
नमस्कार माझा त्या मारूतीला ॥४॥

मोरया मोरया मी बाळ तान्हें ।
तुझीच सेवा करु काय जाणे ॥
अन्याय माझे कोट्यानुकोटी ।
मोरेश्वरा बा तू घाल पोटी ॥५॥

ज्या ज्या ठिकांणी मन जाय माझे ।
त्या त्या ठिकांणी निजरूप तुझे ॥
मी ठेवितो मस्तक ज्या ठिकांणी ।
तेथे तुझे सदगुरू पाय दोन्ही ॥६॥

अलंकापुरी पुण्य भूमी पवित्र ।
तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र ॥
तया आठविता महापुण्यराशी ।
नमस्कार माझा सदगुरू ज्ञानेश्वराशी ॥७॥