जय जय गणपती । ओवाळीत आरती ।
साजि-या सरळ भुजा । परश कमळ शोभती ॥
अवतार नाम भेद । गणा आदी अगाध जयासी पार नाही ।
पुढे खुंटला वाद । एकची दंत शोभे । मुख विक्राळ दोंद ॥
ब्रह्मांडा माजि दावी । ऐसे अनंत छंद ॥०१॥
जय जय गणपती । ओवाळीत आरती ।
साजि-या सरळ भुजा । परश कमळ शोभती ॥
हे मही ठेंगणी हो । तुज नृत्यनायका ॥
भोंवरी फेरे देता । अतुरा मर्दीले एका ॥
घाडले तोडर हो । भक्त जनपाळका ॥०२॥
जय जय गणपती । ओवाळीत आरती ।
साजि-या सरळ भुजा । परश कमळ शोभती ॥
सुंदर शोभला हो । रूपे लोपली तेजें ॥
उपमा काय देऊ । नये आणिक दुजे ॥
रवि शशि तारांगणे । जयामाजी सहजे ॥
उधरी सामावली । जया ब्रह्मांडबीजे ॥०३॥
जय जय गणपती । ओवाळीत आरती ।
साजि-या सरळ भुजा । परश कमळ शोभती ॥
वर्णिता शेष लीला । मुखे भागली त्याची ॥
पांगुळले वेद कैसे । चारी राहिले मुके ॥
अवतार जन्मला हो । लिंग नामिया मूखे ॥
अमूर्त मूर्तिमंत । होय भक्तीच्या सूखे ॥०४॥
जय जय गणपती । ओवाळीत आरती ।
साजि-या सरळ भुजा । परश कमळ शोभती ॥
विश्व हे रूप तुझे । हस्तपाद मुखडे ॥
ऐसाचि भाव देई । तया नाचतां पुढे ॥
धूप दीप पंचारती । ओवाळीन निवाडे ॥
राखें तूं शरणांगता ॥ तुका खेळतां लाडे ॥०५॥
जय जय गणपती । ओवाळीत आरती ।
साजि-या सरळ भुजा । परश कमळ शोभती ॥